बाल मेळाव्यात रंगला सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षिकेच्या हस्ते नारळ वाढवून उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का.) : जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालच्या वतीने होत असलेल्या चाचा नेहरु बाल महोत्सवात जिल्हा परिषद शाळेच्या सहायक शिक्षिका सुनीता धिदंळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शासकीय निरीक्षण बालगृहातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दिंडी आणि देशभक्तीपर गितांनी वाहवा मिळविली.
विजेत्या स्पर्धकांना उद्या होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहे. आज झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास ‘मला प्रितीच्या झुल्यात झुलवा’ ही लावणी सादर करुन वैष्णवी तावडे हिने उपस्थितांची दाद मिळवली. समूह नृत्य, गरबा, देशभक्तीपर गिते,नृत्ये, गीत गायन सादर करुन सांस्कृतिक कार्यक्रमात बहार आणली.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी. काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळे, संरक्षण अधिकारी मिलन कांबळे, परिविक्षा अधिकारी महेश सावंत, उपस्थित होते.
चाचा नेहरु बाल महोत्सवात काल झालेल्या क्रीडा स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे :-
300 मिटर धावणे लहान गट (मुली) प्रथम क्रमांक चैत्राली न्हानु दळवी इ. 7 वी, व्दितीय क्रमांक राखी अनिल मालवे. 100 मिटर धावणे लहान गट (मुलगे) प्रथम क्रमांक पुष्कर चंपालाल गाडरी, व्दितीय क्रमांक आदित्य संतोष राठोड. 100 मिटर धावणे (मोठा गट) (मुलगे) प्रथम क्रमांक सर्वेश राजाराम कदम, व्दितीय क्रमांक चैतन्य संतोष परब.300 मिटर धावणे (मोठा गट) (मुली) प्रथम क्रमांक अपुर्वा रमाकांत पुजारे, व्दितीय क्रमांक यशश्री चंद्रकांत कुडाळकर. रिले लहान गट (मुली) प्रथम क्रमांक चैत्राली न्हानु दळवी, तनिष्का विजय सावंत, साक्षी परशुराम पाटील, प्रगती प्रविण म्हस्के. व्दितीय क्रमांक अंजली अजित राऊळ, अंजली विजय कलकुटकी, श्रावणी संजय गावडे, स्नेहल संजय पाटील. रिले लहान गट (मुले) प्रथम क्रमांक आदित्य संतोष राठोड, अर्णव भरत वारके, यश सुशांत गवस, कुणाल रवींद्र राठोड. व्दितीय क्रमांक सार्थक संतोष परब, स्वरित सतिश गायकवाड, यश हेमंत वस्त,नेहाल मंगेश कलकुटे. रिले मोठा गट (मुली) प्रथम क्रमांक अपूर्वा रमाकांत पुजारे, संजना शंकर पवार, सेजल संजय गवस, यशश्री चंद्रकात कुडाळकर, व्दितीय क्रमांक धनश्री तुकाराम परब, सानिया अजित राऊळ, सिंथिया टेनेलॉस फर्नांडिस, रिले मोठा गट (मुले) प्रथम क्रमांक ओंकार बाळकृष्ण घाडी, सर्वेश राजाराम कदम, प्रविण आजीनाथ सानप, वैभव राजन परब, व्दितीय क्रमांक सोहम संतोष नाईक, गोविंद सुरेश नाईक, चैतन्य संतोष परब, विठ्ठल कोंडू पांढरमिशे. खो-खो लहान गट (मुली) विजेता संघ सौरभ स्पोर्टस. उपविजेता संघ गणेश स्पोर्टस. खो-खो लहान गट (मुले) विजेता संघ रामजी स्पोर्टस. उपविजेता संघ अनिकेत स्पोर्टस. खो-खो मोठा गट (मुली) विजेता संघ मोगरा गट. उपविजेता संघ गुलाब गट. खो-खो मोठा गट (मुलगे) विजेता संघ तानाजी संघ. उपविजेता संघ शिवाजी महाराज. कबड्डी लहान गट (मुली) मुलगे विजेता संघ तानाजी संघ. उपविजेता संघ शिवाजी. कबड्डी लहान गट (मुली) विजेता संघ सौरभ संघ. उपविजेता दुर्गा संघ. कबड्डी मोठा गट (मुली) विजेता संघ B संघ. उपविजेता संघ A. कबड्डी मोठा गट (मुलगे) विजेता संघ शिवाजी महाराज संघ. उपविजेता अजिंक्यतारा संघ. कॅरम लहान गट (मुलगे) प्रथम क्रमांक मानस महेश परब, व्दितीय क्रमांक निशांत अमोल पाटील. कॅरम मोठा गट (मुली) प्रथम क्रमांक छायांकिता परशुराम परब,व्दितीय क्रमांक अपुर्वा रमाकांत पुजारे. कॅरम लहान गट (मोठा गट मुलगे) प्रथम क्रमांक मितेश साईनाथ यादव, व्दितीय क्रमांक जीवन श्यामा जाधव, बुध्दिबळ मोठा गट (मुली) विजेता अनुष्का अनिल मालवे. उपविजेता अपुर्वा रमाकांत पुजारे. बुध्दिबळ लहान गट (मुली) विजेता समृध्दी अशोक जाधव. उपविजेता साक्षी परशुराम पाटील. बुध्दिबळ मोठा गट (मुलगे) विजेता गिरीष अरुण सावळे. उपविजेता गोविंद सुरेश नाईक. बुध्दिबळ लहान गट (मुलगे) विजेता श्लोक गणेश हुक्कीरे. उपविजेता साक्षांत सुरेश मठकर. लांब उडी मोठा गट (मुलगे) विजेता सर्वेश राजाराम कदम. उपविजेता यश अशोक पवार. लांब उडी मोठा गट (मुली) विजेता सेजल संजय गवस. उपविजेता प्राची प्रकाश मालवे. लांब उडी लहान गट (मुलगे) विजेता कुणाल रवींद्र राठोड. उपविजेता बालाजी कृष्णा नाईक. लांब उडी लहान गट (मुली) विजेता चैत्राली न्हानु दळवी. उपविजेता स्नेहल संजय पाटील. वक्तृत्व स्पर्धा मोठा गट (मुली) विजेता प्रांजल छोटीराम चौरे,उपविजेता सृष्टी पिंगुळकर. वक्तृत्व स्पर्धा मोठा गट (मुले) विजेता वेदांत भगवान आचरेकर. वक्तृत्व स्पर्धा लहान गट (मुली) प्रथम क्रमांक, पुजा बापुराव केदार. व्दितीय क्रमांक राखी अनिल मालव. तृतिय क्रमांक मृणाली प्रशांत कासार. वक्तृत्व स्पर्धा लहान गट (मुलगे) प्रथम क्रमांक, स्वराज रणजित पाटील. व्दितीय क्रमांक रोहित मारोती देशटवाड. तृतिय क्रमांक निहित भार्गव मालवणकर. गोळा फेक लहान गट (मुली) प्रथम क्रमांक, अंजली अजित राऊळ, सानिका मदनलाल सोळंके व्दितीय क्रमांक सुरभी अनिल जाधव. गोळा फेक लहान गट (मुलगे) प्रथम क्रमांक, पुष्कर चंपालाल गाडरी, व्दितीय क्रमांक लक्ष्मी कोंडू पांढरमिशे. गोळा फेक मोठा गट (मुलगे) प्रथम क्रमांक, चैतन्य संतोष परब, व्दितीय क्रमांक ओंकार दिनेश ठाकुर. गोळा फेक मोठा गट (मुली) प्रथम क्रमांक, संजना शंकर पवार, व्दितीय क्रमांक तृप्ती गुरुदत्त दळवी.
0000

Comments
Post a Comment