ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र ऑफलाईन भरण्यास परवानगी 2 डिसेंबरपर्यंत मुदतही वाढली - उप सचिव के.सूर्यकृष्णमूर्ती
सिंधुदुर्गनगरी,दि.1 (जि.मा.का.) : विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली असून, नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत ही 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे उप सचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी आज दिली.
उपसचिव श्री. सूर्यकृष्णमूर्ती यांनी याबात आजच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.
००००
Comments
Post a Comment