क्रीडा सुविधांचा लाभ घेवून व्यक्तीमत्वाचा विकास साधावा क्रीडा उपसंचालक - संजय सबनीस

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.): शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रीडा सुविधांचा जास्तीत लाभ घेवून आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास साधावा असे प्रतिपादन कोल्हापुर विभागाचे क्रीडा व युवा उपसंचालक, संजय सबनीस यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 11 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत करण्यात आलेले होते. स्पर्धेच्या उदघाटनाच्या कार्यक्रमास भारतीय वेटलिफ्टींग असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने,अनिल माऊली, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टींग असो. संजय मिसाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह खेळाडू, पंच, प्रशिक्षक आदी उपस्थित होते. देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे कै. पै. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, यांनी केले तर अध्यक्षीय समारोप संजय मिसाळ यांनी केला. यांनतर आंतरराष्ट्रीय खेळाडु भूमिका मोहिते हिने स्पर्धेत सहभागी खेळाडूंना खिळाडूवृत्ती ने खेळण्याची शपथ दिली. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व मार्गदर्शक मधुरा सिंहासने, उज्ज्वला माने, नितीन म्हाळसकर, राजेश कामथे यांच्यासह पंच, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच विजय माळी, विजय पाटील. संजय मिसर, दिपक रुईकर, प्रविण व्यवहारे, रविंद्र चव्हाण, विजय तारे, जितेंद्र धनाजी, गणेश खानविलकर, योगेश चव्हाण, स्वरुप प्रभाळे, धनश्री मोरे, अनिल माहुली, संजय मोरे, संतोष सिंहासने, सुरेश कुंभार, मधुसुदन देशपांडे, राजेश कामथे, राजेश शर्मा. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील आठ विभागामधून 121 स्पर्धक सहभागी झाले होते. 17 वर्षांखालील व 19 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात प्रत्येकी दहा वजनी गटातील स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. 17 वर्षाखालील मुली, वजन गट 40 किलोआतील प्रथम - अश्विनी चौधरी नाशिक, व्दितीय - श्रेया पाटील कोल्हापूर, तृतीय - नजिमा शेख पुणे. वजन गट 45 वर्षाखालील प्रथम क्रमांक अस्मिता ढोणे-कोल्हापूर,व्दितीय-किरण पवार लातूर, तृतीय तपस्या मते पुणे, वजन गट 49 वर्षाखालील प्रथम- श्रावणी जाधव कोल्हापूर, व्दितीय-वेदिका टोळे मुंबई, तृतीय- श्रावणी पुरंदेर नाशिक. वजन गट -55 वर्षाखालील प्रथम माही बाभुळकर मुंबई, व्दितीय-प्राची माळी कोल्हापूर, तृतीय- हर्षिता पठारे पुणे. वजन गट 59 वर्षाखालील प्रथम भूमिका मोहिते- कोल्हापूर,व्दितीय -समृध्दी ढोणे क्रीडा प्रबोधिनी, तृतीय- सई शिंदे पुणे. वजन गट 64 वर्षाखालील प्रथम तनुजा पोळ कोल्हापूर, व्दितीय नक्षत्रा इंगळे अमरावती, तृतीय- सान्वी जागडे पुणे. वजन गट 71 वर्षाखालील प्रथम- राजनंदिनी आमणे कोल्हापूर, व्दितीय- आनंदी सांगळे नाशिक, तृतीय- पुनम काकडे पुणे. वजन गट 76 वर्षाखालील प्रथम- ग्रीष्मा थोरात मुंबई, व्दितीय- समिक्षा मानकुमरे पुणे, तृतीय- सिध्दी पवार कोल्हापूर. वजन गट 81 वर्षाखालील प्रथम- हर्षदा पाटील कोल्हापूर, व्दितीय अस्मिता पताळे पुणे, तृतीय- इशा गिरी मुंबई. वजन गट 81 वर्षावरील प्रथम- अक्षदा कदम क्रीडा प्रबोधिनी व्दितीय - अंकिता थोरात कोल्हापूर, तृतीय- रामाणी प्रधान मुंबई. 19 वर्षाखालील मुली वजन गट - 45 वर्षाखालील प्रथम काजोल सरगर कोल्हापूर, व्दितीय सरस्वती पाटणे लातुर, तृतीय- कोमल पवार मुंबई. वजन गट 49 वर्षाखालील प्रथम- हर्षदा पाटील कोल्हापूर, व्दितीय-खुशी काते क्रीडा प्रबोधिनी, तृतीय साक्षी कोंबडे, लातूर. वजन गट-55 वर्षाखालील प्रथम सोनाली पाटील कोल्हापूर, व्दितीय-पूजा वैष्णव नाशिक, तृतीय- वैष्णवी बामणे क्रीडा प्रबोधिनी. वजन गट 59 वर्षाखालील प्रथम- साक्षी वानखेडे नाशिक,व्दितीय उत्कर्षा कर्नाळे कोल्हापूर, तृतीय-समृध्दी उगारे मुंबई. वजन गट 64 वर्षाखालील प्रथम राजलक्ष्मी पोवार कोल्हापूर, व्दितीय साक्षी म्हाळसकर पुणे, तृतीय-स्नेहा खांबेकर मुंबई. वजन गट 71 वर्षाखालील प्रथम- सई कर्नाळे कोल्हापूर, व्दितीय-मनश्री निकाळजे पुणे, तृतीय साक्षी बुरकुले अमरावती, वजन गट 76 वर्षाखालील - प्रथम- श्रावणी कोल्हापूरे कोल्हापूर, व्दितीय पोर्णिमा धिर्डे मुंबई, तृतीय-करिश्मा शहा नाशिक. वजन गट 81 वर्षाखालील प्रथम निकीता वाघ औरंगाबाद, व्दितीय मुस्कान सय्यद पुणे, तृतीय- अंकिता ठोमके कोल्हापूर. वजन गट 87 वर्षाखालील प्रथम- प्रज्ञा दळवी कोल्हापूर, व्दितीय गौरी अडसरे मुंबई. वजन गट 87 वर्षावरील प्रथम- आहना कपुरिया नागपूर, व्दितीय- वर्षिता बोल्लम पुणे, तृतीय- विशाखा बोदडे अमरावती, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. 0000 --

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'