अपघातग्रस्त वृध्द महिलेसह जखमींना एलसीबीची तात्काळ मदत

सिंधुदुर्गनगरी,दि.27 (जि.मा.का.) मुंबई -गोवा महामार्गावर वागदे डंगळवाडी येथे आज सकाळी मोटरसायकल घसरुन झालेल्या अपघातातील वृध्द महिलेसह दोघा जखमींना एलसीबी पथकातील पोलीसांनी तात्काळ शासकीय वाहनातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पोहचवले. त्यामुळे वेळेत वैद्यकीय उपचार सुरु झाले. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील शुभांगी आत्माराम गावडे (वय 68) सत्यवान आत्माराम गावडे (वय 39 ) अशी जखमींची नावे आहेत. आई आणि मुलगा दोघेही ओरोस येथे कामानिमित्त मोटरसायकलवरुन जात होते. उड्डाणपुलावर लक्षात न आल्यामुळे ते ओरोस ऐवजी पुढे कणकवलीपर्यंत आले. चौकशी केली असता त्यांना ओरोस मागे राहिल्याचे लक्षात आल्यानंतर सत्यवानने मोटरसायकल पुन्हा ओरोस च्या दिशेने वळवली. दरम्यान वागदे येथे रस्त्यावर मांजर आडवे आल्यामुळे मोटरसायकल रस्त्यावर घसरली. यात दोघेही जखमी झाले. कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एलसीबी च्या पथकातील हवालदार राजू जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे, चालक रवी इंगळे यांनी तात्काळ आपल्या शासकीय वाहनातून दोघांनाही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्तांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे डॉ. चौगुले यांनी तात्काळ जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू केले. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'