‘पेन्शनर्स डे’ 16 डिसेंबर रोजी
सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.): जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग येथे सर्व निवृत्तीवेतन धारकांना वेळेत व उत्तम दर्जाची सेवा देण्यात अग्रणी आहे. 17 डिसेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी व निवडणुक कर्तव्यात कोषागारातील बहुतांशी कर्मचारी व्यस्त असल्याने या वर्षी शुक्रवार 16 डिसेंबर रोजी ‘पेन्शनर्स डे’ आयाजित करण्यात आला आहे.
जिल्हा कोषागार कार्यालय येथे यानिमित्ताने शुभेच्छा फलक, रांगोळी, निवृत्तीवेतन धारक यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच निवृत्ती वेतन बाबत काही अडचणी असल्यास त्याबाबत चर्चा आदी उपमक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांनी दिली.
0000
Comments
Post a Comment