पीडितांना लवकरात लवकर अर्थसहाय्य द्या -रवींद्र मठपती
सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का.) पीडितांना लवकरात लवकर अर्थसहाय द्यावे, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी दिली.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. मठपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रभारी सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. बैठकीत मागील इतिवृत्ताचे वाचन करुन मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) 1989 अंतर्गत माहे जानेवारी 1995 ते 28 डिसेंबर 2022 अखेर गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच पीडित लाभार्थ्यास देय अर्थसहाय्याचा आढावा घेण्यात आला. बैठकीस समाज कल्याण कार्यालयाचे पोलीस निरीक्षक एस.बी.गावडे उपस्थित होत्या.
0000
Comments
Post a Comment