जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 8 ते 10 डिसेंबर कालावधीत

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धाचे आयोजन दि.8 ते 10 डिसेंबर 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनरी येथे करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि विभागीय व राज्यस्तर स्पर्धांच्या व्यस्ततेमूळे स्पर्धेचे ठिकाण व स्पर्धा कार्यक्रमात बदल करण्यात येत आहे. ही स्पर्धा दि. 8 डिसेंबर 2022 (सर्व गट मुली व 14 वर्ष मुले) दि.9 डिसेंबर 2022 रोजी 17 व 19 वर्षे मुले) जय गणेश इंग्लिश मेडीयम स्कुल, मालवण येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सन 2022-23 मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'