‘मंडणगड पॅटर्न’ या उपक्रमांतर्गत ‘सहज सुलभ’ जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीर संपन्न
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.): जिल्हा जात प्रमाणपत्र समिती मार्फत ‘मंडणगड पॅटर्न’ या उपक्रमांतर्गत ‘सहज सुलभ’ जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीर कणकवली कॉलेज कणकवली येथे 15 डिसेंबर रोजी संपन्न झाले असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी दिली.
12 वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी वैद्यकीय,अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी अशा उच्च व्यावसायिक अभ्यास क्रमास प्रवेश घेतात. प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांना जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी करणे, प्रमाणपत्र देणे इ. प्रक्रिया करण्यासाठी समितीला पुरेसा वेळ आवश्यक असतो. 12 वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास व प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये. हा हेतू लक्षात घेवून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्गमार्फत सहज,सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी हा मार्गदर्शन पर उपक्रम कणकवली कॉलेज कणकवली येथे राबविण्यात आला.
समिती मार्फत ‘मडणगड पॅटन’ या उपक्रमांतर्गत ‘सहज सुलभ’ जात प्रमाणपत्र पडताळणी या मार्गदर्शन शिबिराचे कणकवली कॉलेज कणकवली येथे आयोजन करण्यात आला होते. या मार्गदर्शन शिबीरास 12 वी विज्ञान शिकणारे विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्गचे उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबतचे सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मूळ गावी जात प्रमाणपत्र प्राप्त करुन त्या जिल्ह्याच्या समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावा. आपल्या जात प्रमाणपत्रावरिल नोंदी योग्य आहेत काय याची खात्री करावी. प्रवेश प्रक्रियेच्या 5 महिन्या पुर्वी अर्ज सादर करावा. मानीव दिनांकापुर्वीचा जात नोंद असणारा सर्वात जुना पूरावा हा महत्वाचा आहे. मूळ कागदपत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वत: बदल करु नये. महाराष्ट्रातील मूळ रहिवाशी असल्यास त्याला महाराष्ट्र राज्यातील लाभ मिळतील. न्यु ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर 30 दिवसात समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जा सोबत सर्व कागदपत्राच्या मूळ व सुस्पष्ट प्रती सादर करणे आवश्यक आहे. अर्ज कसा भरावा, वंशावळ प्रतिज्ञापत्र कसे करावे. अशा विविध मुद्दांची सविस्तर माहिती दिली.यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे शंका निरसन ही करण्यात आले.
सर्व महाविद्यालयांना एक परिपत्रक व माहितीपत्रक ही देण्यात आले. सन 2022-23 ची प्रवेश प्रक्रिया संपत आली आहे. त्यामुळे पुढील 2023-24 ची पूर्वतयारी म्हणून हे उपक्रम आता सुरु केले आहेत. यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्यात होणारी विद्यार्थीं व पालक वर्गाची धावपळ व समिती वरील ताण ही कमी करता येईल, तसेच विद्यार्थ्यांना विहीत मुदतीत सहज, सुलभ पध्दतीने जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त होईल.
या कार्यक्रमास पोलीस दक्षता पथकाचे पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले- महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एम.डी.कांबळे, शिक्षक वृंद, शिक्षकत्तेर कर्मचारी मंगेश आरेकर व 12 वी विज्ञान शोखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
या पार्श्वभुमीवर 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकरअर्ज सादर करावेत. अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी सी.ई.टी चा अर्ज भरल्यावर त्वरीत अर्ज सादर करावेत. असे आवाहन डॉ.जोत्स्ना पडीयार- अध्यक्ष, प्रमोद जाधव उपायुक्त तथा सदस्य, संशोधन अधिकारी सचिन साळे, तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्गव्दारे करण्यात येत आहे.
0000
Comments
Post a Comment