आपदा मित्र' समाजाचे ऋण फेडण्याची संधी-डाॕ जयकृष्ण फड

सिंधुदुर्ग दि.३० (जिमाका) 'आपदा मित्र' म्हणून काम करत समाजाचे ऋण फेडण्याची एक चांगली संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. त्या संधीचा आपण सुयोग्य वापर कराल, अशी अपेक्षा प्र. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण  फड यांनी व्यक्त केली.
     आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृहात आज झाला. डाॕ फड म्हणाले, आपदा मित्र म्हणून प्रशासनाने आपल्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे.आपल्या स्थानिक भागात निर्माण झालेल्या आपत्तीवर उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने आपण विजय मिळवाल. तरुणांनी ध्येय वेडे असले पाहिजे. आपल्याला आपले ध्येय ठरवणे आवश्यक आहे.
     प्रथमतः प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व आपदा साहित्य किट चे वाटप करण्यात आले. यावेळी आपदा मित्रांच्यावतीने सहदेव नारायण सनाम, प्रथमेश पांडुरंग पावसकर, दत्ताराम जगन्नाथ मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. १२ दिवस चाललेल्या या निवासी प्रशिक्षण वर्गात योगा, झूंबा डान्स, दोरीपासून गाठी बनविणे, आग लागल्यास त्यावर करावयाच्या उपाययोजना, जखमी व्यक्तींना कसे हाताळावे, स्ट्रेचर चे विविध प्रकार, दरी पार करणे, स्कुबा डायव्हिंग, रबर बोट चालविणे यांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.  
प्रत्येक प्रशिक्षणार्थींचा ५ लाखांचा विमा राज्य शासनामार्फत उतरविण्यात आला. उपस्थित प्रशिक्षणार्थींचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमही काल पार पडले.
  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, एनसीसी चे श्री.इंद्र केश, पतंजली योग समितीचे डॉ. तुळशीराम रावराणे आदी उपस्थित होते. विविध गुणदर्शन कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर, अविशकुमार सोनोने तहसीलदार अमोल पाठक, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अरुण उंडे उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'