कन्यादान योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यात अर्ज करावेत - विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव

सिंधुदुर्गनगरी,दि.8 (जि.मा.का.): जिल्‍ह्यातील अनुसूचित जमातीच्‍या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दांपत्याकरिता तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व नामांकित स्वयंसेवी संस्थाकडून कन्यादान योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्याने योग्य त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी केले आहे. सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना रु. 10 हजार रुपये इतके अनुदान देय आहे. तसेच लग्न सोहळा आयोजित करण्यासाठी सेवाभावी संस्था तयार असल्यास सदर कार्यक्रम आयोजन करण्यासाठी रु. 10 हजार इतके अनुदान देय आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी विहित नमुन्यातील कन्यादान योजनेचा अर्ज. दोन पासपोर्ट साईज फोटो. रहिवाशी दाखला. जातीचे दाखला. वयाबाबतचा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला.विवाह न झाल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रु. 100 च्या स्टॅम्प वर नमुद करावे. लाभार्थ्यांना विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण जि. रायगड या कार्यालयातील कन्यादान योजना कक्षाकडून उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. कन्यादान योजनेचा लाभ जास्तीत- जास्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी घ्यावा व या योजनेकरिता अर्ज सादर करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'