ग्राहक प्रशिक्षित आणि जागृत हवा - दादासाहेब गिते

सिंधुदुर्गनगरी,दि.28 (जि.मा.का.) खरेदी विक्री व्यवस्थेतील ग्राहक हा राजा आहे. याची फसवणूक होऊ नये, म्हणून कायमच यंत्रणेने जागृत राहणे गरजेचे आहे. कायद्याने ग्राहकांचे हक्क मिळवून देण्यासाठी यंत्रणा निर्माण केलेली असली तरी ग्राहक प्रशिक्षित होऊन जागृत झाला पाहिजे, असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी व्यक्त केले. जिल्ह्याचा राष्ट्रीय ग्राहक दिन देवगड येथे घेण्यात आला यानिमित्त ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, एसटीचे विभागीय नियंत्रक प्रशांत वासकर, कृषी अधिकारी कैलास ढेपे, जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष सुरेश पाटील तसेच ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि दीप प्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी आपल्या भाषणात ग्राहकांचे अधिकार , ग्राहकांना न्याय देणारी शासनाची त्रिस्तरीय यंत्रणा व स्वयंसेवी संघटना म्हणून काम करणारी ग्राहक पंचायत याबाबत सविस्तर माहिती विशद केली. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजेत अवैध व्यापाराच्या विरोधात आम्ही असून ग्राहकांवर होणारा अन्याय आणि सहन करू नये यासाठी ग्राहकांनी उभारण्यात आलेल्या यंत्रणेची मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले ग्राहक जागृतीसाठी जिल्हा ग्राहक पंचायतीतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्राचे व बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी प्रास्ताविकेत प्रदीप कदम यांनी, ग्राहक कायद्याचा उगम व त्यातील सुधारणा याची माहिती दिली.मेळाव्यासाठी बहुसंख्या ग्राहक शासकीय अधिकारी उपस्थित होते. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'