स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगळवारी समुद्र किनारे स्वच्छता

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का):- स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून मंगळवार दि. 27 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ करण्याकरिता समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्हावासियांनी या समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांत सहभाग घ्यावा,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटकांची मोठ्याप्रमाणात रेलचेल जिल्ह्यात असते जिल्ह्यात येणारा पर्यटक समुद्र किनारी भेटी देत असतो. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ सुंदर समुद्र किनारे पाहता यावेत या हेतूने दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते 11.30 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारी स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन श्रमदानातून होणार आहे. तरी जिल्हावासियांनी आपल्या नजिकच्या समुद्र किनारी जाऊन श्रमदान करुन समुद्र किनारे स्वच्छ करावेत असे आवाहन ही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर यांनी केले आहे. मालवण ग्रामपंचात तोंडवली येथील समुद्र किनारा स्वच्छतेकरिता जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थित राहून श्रमदान करणार आहेत. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'