अशासकीय सदस्यसाठी 12 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत - सोमनाथ रसाळ
सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का.) : केंद्र शासनाच्या बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 कलम 54 व राज्य शासन नियम 2(21) नूसार नोंदणीकृत शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, ओरोस य संस्थेच्या तपासणीसाठी अशासकीय सदस्य 1(बाल हक्क, संगोपन संरक्षण कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहाचा 1 सदस्य) नेमावयाचा आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 12 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.
अटी शर्ती:- अशासकीय व्यक्ती किमान पदवीधर,बाल हक्क, काळजी संरक्षण क्षेत्रातील किमन 10 वर्षाचा अनुभव आवश्यक, सदस्यांचे वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. अशासकीय सदस्यांचा कालावधी नेमणुकीपासून 3 वर्षाचा राहील.
सदर अटी शर्ती नूसार पात्र व इच्छुक उमेदवारांनी दि.12 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग प्रशासकीय इमार,ए विंग, तळमजला ओरोस, सिंधुदुनगरी या कार्यालयमध्ये अर्ज सादर करावयाचे आहेत. विहित मुदतीमध्ये आलेल्या अर्जाचा विचार केला जाईल.
00000
Comments
Post a Comment