राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धा 11 ते 13 डिसेंबरला

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का.) : जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि मामाचो गाव रिसॉर्ट, हिर्लोक, यांचे सहकार्याने सन 2022-23 या वर्षात राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग (17 व 19 वर्षाखालील मुली) क्रीडा स्पर्धा दिनांक 11 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत मामाचो गाव रिसॉर्ट, हिर्लोक,कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालये, खेळाडू, क्रीडा प्रेमी व नागरीक यांनी या स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या सत्रातील तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचें आयोजन करण्यात आले आहे. 0000 --

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'