विभागस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धीबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोक यांच्या सहकार्याने आयोजित दिनांक 15 ते 16 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या विभागस्तरीय शालेय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन लेखाधिकारी प्रमोद चिंदरकर,यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बुद्धीबळ असोसिएशन अध्यक्ष चिंतामणी लिमये, आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेती पुष्पलता मंगल, मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोकचे संचालक आनंद सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस आदी उपस्थित होते. विभागस्तरीय स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, इचलकरंजी मनपा, सांगली मनपा, कोल्हापूर मनपा या जिल्हयांतून एकूण 212 खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धा पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धीबळ असोसिएशनचे पंच व तांत्रिक अधिकारी दिपक वायचळ, शार्दुल तपासे, चिंतामणी लिमये, स्वानंद चोथे, श्रीकृष्ण आडेलकर पंचांच्या सहकार्याने बुद्धीबळ स्पर्धा पार पडणार आहेत. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'