स्टँड अप इंडिया योजनेसाठी पात्र लाभार्थीनी अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का):- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता 15 टक्के मार्जिन मनी या योजनेसाठी पात्र लाभार्थीनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. जिल्हयातील अनुसुचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर ,बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यांनतर उर्वरित मार्जिन मनी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येतील. केंद्र शासनाने सन -2015 मध्ये स्टँड अप इंडिया हि योजना घोषित केली आहे. या योजनेंतर्गत सिडबीने रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्याना जे कर्ज दिले जाते,त्याला सिडबी हमी देईल. या योजनेअंतर्गत संबंधित लाभार्थींनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के रक्कम द्यावयाची आहे. सन- 2022-23 या वर्षात जिल्हयाकरिता एकुण 05 पाच उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक लाभार्थी असतील, जिल्हयाच्या संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांचेकडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव सादर करावित. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'