जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 27 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत- विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वतीने सन 2022-23 या वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग) तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी दि.27 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत. तरी क्षेत्रातील जास्तीत -जास्त क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंनी अर्ज सादर करावित. असे आवाहन जिल्हा जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाचे योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणाअंतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत आहे. या पुरस्काराअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत जास्त चार पुरस्कार देण्यात येतील. तसेच शासन निर्णयामध्ये नमुद आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना ज्यादाचा पुरस्कार गणल्या जाईल. यात गुणवंत खेळाडू पुरस्कार -3 (1 महिला, 1 पुरुष व 1 दिव्यांग तसेच 1 गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व 10 हजार रुपये फक्त या बाबींचा समावेश राहील. सदर पुरस्काराकरीता अर्ज करणऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराकरीता यामध्ये सतत 10 वर्ष त्या जिल्ह्यात क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य असले पाहीजे तसेच गेल्या 10 वर्षांत किमान वरीष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय ग्रामीण व महिला (खेलो इंडीया) मधील राष्ट्रीय स्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असा क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहिल. तसेच त्याने वयाची 35वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकणाकरीता त्या जिल्ह्ययातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राहय धरली जाईल. गुणवंत खेळाडू पुरस्काराकरीता (पुरुष, महिला व दिव्यांग) खेळाडू पुरस्कार वर्षसह लगत पूर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहीजे. सदर पुरस्काराचे वर्ष 1 जुलै ते 30 जुन या कालावधी मधील राहील. अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या जिल्हयातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) यांनी या पुरस्काराचा विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीकरीता मनिषा पाटील क्रीडा अधिकारी 7588461688 व शाम देशपांडे तालुका क्रीडा अधिकारी 97300010085 या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी खालील खेळाचा विचार केला जाईल. धनुर्विद्या, मैदानी क्रीडा स्पर्धा, मुष्ठीयुद्ध, क्रिकेट, बडमिंटन, फुटबॉल, बिलियर्डस अॅण्ड स्नुकर, हॅण्डबॉल, कॅरम, हॉकी, बुध्दीवळ, ज्युदो, सायकलिंग,कबड्डी, तलवारबाजी, कयाकिंग / कॅनोईग, गोल्फ, खो-खो, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन (पॉवरलिफ्टींग), अश्वारोहण, रोईंग, लॉनटेनिस, तायक्वांदो, मल्लखांब, नेमबाजी, व्हॉलीबॉल, वजन उचलणे (वेटलिफ्टींग), स्केटिंग, कुस्ती (रेसलिंग),जलतरण (डायव्हींग वॉटरपोलो), वुशू, टेबलटेनिस, यॉटींग, ट्रायथलॉन, सॉफ्टबॉल,आट्यापाट्या,रग्बी, बास्केटबॉल, ,मॉडर्न पॅटॉथलॉन, शरीरसौष्ठव, बेसबॉल, स्पोर्ट क्लाइंबिग,स्क्वॅश, 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'