14 वर्षाखाली थ्रोबॉल स्पर्धेत सांगली प्रथम
सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) विभागस्तरीय शालेय थ्रोबॉल 14, वर्षाखालील मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेत सांगली प्रथम, सांगली मनपा व्दितीय तर कोल्हापूरने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, इचलकरंजी मनपा, सांगली मनपा, कोल्हापूर मनपा या जिल्हयातून एकुण 576 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा थ्रोबॉल असोसिएशनचे पंच व तांत्रिक अधिकारी अजय शिंदे, सुनिल भाटिवडेकर, पंकज राणे, सचिन पाताडे, सोमनाथ गोधळी, कदम इत्यादी पंचांच्या सहकार्याने थ्रोबॉल स्पर्धा पार पाडण्यात आल्या. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 14 वर्षाखालील मुली, प्रथम सांगली, व्दितीय- सांगली मनपा, तृतीय- कोल्हापूर, 14 वर्षाखालील मुले प्रथम- सांगली, व्दितीय- सांगली मनपा, तृतीय- कोल्हापू. 17 वर्षाखालील मुली प्रथम- कोल्हापूर, व्दितीय -सांगली मनपा, तृतीय- सांगली. 17 वर्षाखाली मुले प्रथम- सांगली व्दितीय- सांगली मनपा, तृतीय- रत्नागिरी. 19 वर्षाखालील मुली प्रथम- सांगली मनपा, व्दितीय -कोल्हापूर, तृतीय- सांगली. 19 वर्षाखीलील मुले प्रथम -सांगली, व्दितीय- कोल्हापूर, तृतीय सातारा. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली.
0000
Comments
Post a Comment