शासकीय धान (भात) खरेदी विक्रीसाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.१२(जि.मा.का.) : खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीकरिता दिनांक 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन पध्दतीने शेतकरी नोंदणी करिता जिल्ह्यात एकूण 41 ठिकाणी धान खरेदी केंद्रावरती शेतकरी नोंदणी सुरु आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी, ए. एस. देसाई यांनी दिली. सावंतवाडी तालुका- खरेदी विक्री- संघामार्फत कोलगाव,सावंतवाडी,मळगाव,मळेवाड,डेगवे तळवडे, भेडशी, इंन्सुली, मडुरा. कुडाळ तालुका- खरेदी- विक्री संघामार्फत कुडाळ, पिंगुळी, माणगाव, कडावल, आंब्रड,घोडगे, गोठोस, कसाल, वेताळबांबार्डे, पणदूर, तुळस, निरुखे,निवजे,फोंडा, मालवण तालुका- खेरदी विक्री संघामार्फत पेंडूर, गोठणे, मालवण, विरण, वेंगुर्ला तालुका- खरेदी विक्री संघमार्फत वेंगुर्ला व होडावडा. देवगड तालुका- खरेदी विक्री संघामार्फत देवगड, पडेल, पाटगाव. वैभववाडी तालुका- खरेदी विक्र संघामार्फत वैभववाडी आणि करुळ .कणकवली तालुका- खरेदी विक्री संघामार्फत कणकवली, लोरे नं.1, घोणसरी, सांगवे. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ लि. मार्फत ओरोस, कट्टा, मसुरे, इत्यादी केंद्रावर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. शासनाकडून पणन हंगाम 2022-23 करीता किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करिता शासनाकडून प्रति क्विंटल दर रु. 2040 जाहिर करण्यात आलेला आहे. तरी शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडून 7/12 उतारा प्राप्त करुन घ्यावे. उताऱ्याबाबत काही अडचणी असल्यास तात्काळ तहसिल कार्यालयासी व जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालय, 8108182934 संपर्क साधून 7/12 प्राप्त करुन घेवून भात खरेदी केंद्रावर दि.15 डिसेंबर 2022 अखेर नोंदणी करुन घ्यावी, अशी माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी श्री.देसाई यांनी दिली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'