खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र अव्वल

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.): देशातील प्रतिभासंपन्न युवा पिढीला त्यांचे क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याकरीता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी खेलो इंडिया युथ गेम्स या क्रीडा स्पर्धेचे आयोजन देशात करण्यात येत आहे. या वर्षी 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23 चे आयोजन मध्य प्रदेश राज्यामार्फत करण्यात आले. महाराष्ट्र राज्याने सहभाग घेतलेल्या एकूण 24 क्रौडा प्रकारांपैकी राज्यास 20 क्रीडा प्रकारामध्ये 56 सुर्वणपदके, 55 रौप्यपदके व 50 कांस्यपदके अशी एकुण 161 पदके प्राप्त झाली असून 5 व्या खेलो इंडिया. युथ गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. मध्यप्रदेश मध्ये 08 व दिल्ली येथे 01 असे एकूण 09 ठिकाणी 27 क्रोडा प्रकाराच्या स्पर्धाचे दि. 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले. 5व्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये समावेश करण्यात आलेल्या एकूण 27 क्रीडा प्रकारांपैकी महाराष्ट्र राज्याने 24 क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविलेला होता. या 24 क्रीडा प्रकारांमध्ये एकूण 384 खेळाडू 113 क्रोडा मार्गदर्शक व्यवस्थापक, सहाय्यक कर्मचारी वर्ग, अधिकारी व पदाधिकरी यांचा सहभाग होता. महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंनी संपादित केलेल्या पदकांचे विवरण खालीलप्रमाणे आहे.खेळ निहाय प्राप्त पदकांचे विवरण खेळ बाबु सुर्वणपदक रजतपदक कास्यपदक एकुण मैदानी 03 07 03 13 आर्चरी 01 02 02 5 कबड्डी 0 01 01 2 खो-खो 01 01 2 बॉक्सींग 03 01 02 06 योगासन 05 06 05 16 मल्लखांब 02 03 04 09 जलतरण 16 05 07 28 तलवारबाजी 04 03 02 09 ज्युदो 01 04 02 07 जिम्नॅस्टिक्स 07 05 07 19 सायकलिंग 04 06 02 12 बॅडमिंटन 0 01 0 01 लॉनटेनिस 0 0 01 01 टेबल टेनिस 02 01 02 05 कॅनोईग,कयाकिंग 0 0 01 01 रोईग 0 01 0 01 शुटींग 01 01 02 04 वेटलिफ्टींग 04 01 02 7 कुस्ती 02 06 04 12 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23 मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी योगासन या क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या कु.स्वराज फिसके या इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या केवळ 11 वर्षे वय असलेल्या खेळाडूने आर्टिस्टिक सिंगल या स्पर्धा प्रकारात सुवर्णपदक व पारंपारिक योगा या स्पर्धा प्रकारात कांस्यपदक प्राप्त करून या क्रीडा स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा पदक विजेता होण्याचा बहुमान पटकाविला आहे. जलतरण या क्रीडा प्रकारात कु.अपेक्षा फर्नाडिस या मुंबईच्या खेळाडूने 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक या स्पर्धा प्रकारात 2 मि. 39.87 सेकंद इतकी वेळ नोंदवित खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये नवीन उच्चांक प्रस्थापित करीत सुवर्ण पदक संपादित केले आहे. वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात कु.अस्मिता दत्तात्रय ढोणे या कोल्हापूरच्या खेळाडूने 45 किलो वजनगटात क्लीन अॅन्ड जर्क या स्पर्धा प्रकारात 82 कि. ग्रॅ. इतके वजन उचलून नवीन उच्चांक प्रस्थापित करत रौप्य पदक प्राप्त केले आहे. वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात कु.वीणाताई संतोष आहेर या खेळाडूने 40 किलो वजनगट 57 किलो स्नंच आणि 72 किलो क्लीन अॅन्ड जर्क असे एकूण 129 किलो वजन उचलून नवीन राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात कु.आकांक्षा किशोर व्यवहारे या खेळाडूने 45 किले वजनगटात 67 किलो स्नंच आणि 77 किलो क्लीन अॅन्ड जर्क असे एकूण 144 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केलेली आहे. महाराष्ट्राच्या खो-खो मुले या संघाने सलग पाचव्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. खेलो इंडिया युथ गेम्स बाबत संक्षिप्त माहिती • पहिल्या खेलो इंडिया गेम्स चे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते. 2018 मध्ये आयोजित या स्पर्धेमध्ये एकुण 16 क्रीडा प्रकारांचा समावेश होता. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये 38 सुर्वण पदकांसह एकूण 102 पदके प्राप्त करून हरयाणा प्रथम स्थानावर तर 36 सुर्वण पदकासह एकूण 111 पदके प्राप्त करत महाराष्ट्र राज्यास व्दितीय स्थानावर समाधान मानावे लागले होते. पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या 2 ऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2019 मध्ये एकुण 18 क्रोडा प्रकाराचा समावेश होता. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये 85 सुवर्ण पदकांसह एकूण 228 पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्याने प्रथम स्थान प्राप्त केलेले होते. तर 62 सुर्वण पदकासह एकूण 178 पदके प्राप्त करून हरियानाने व्दितीय स्थान प्राप्त केले होते. गुवाहाटी, आसाम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या 3 ऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2020 मध्ये एकुण 20 क्रीडा प्रकारांचा समावेश होता. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये 78 सुवर्ण पदकांसह एकूण 256 पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्याने प्रथम स्थान प्राप्त केलेले होते. तर 68 सुवर्ण पदकासह एकूण 200 पदके प्राप्त करून हरियानाने व्दितीय स्थान प्राप्त केले होते. हरियाणा (पंचकुला) या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या 4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये एकुण 25 क्रीडा प्रकारांचा समावेश होता. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये 52 सुर्वण पदकांसह एकूण 137 पदके प्राप्त करून हरयाणा राज्याने प्रथम स्थान प्राप्त केलेले होते तर 45 सुवर्ण पदकासह एकूण 125 पदके प्राप्त करून महाराष्ट्रने व्दितीय स्थान प्राप्त केले होते. नुकत्याच मध्यप्रदेश मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये एकूण 27 क्रीडा प्रकारांचा सहभाग होता. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये 56 सुवर्ण पदकांसह एकूण 161 पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्याने प्रथम स्थान प्राप्त केलेले आहे. तर 41 सुवर्ण पदकासह एकूण 128 पदके प्राप्त करून हरयानाने व्दितीय स्थान प्राप्त केले आहे. राज्यातील खेळाडूंनी देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचे नाव क्रीडा क्षेत्रात अग्रक्रमावर पुन्हा एकदा कोरल्याबद्दल क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी खेळाडूचे हार्दिक अभिनंदन केले व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धामध्ये देखील अशाच कामगिरीची खेळाडूकडून अपेक्षा व्यक्त केली, असून त्याकरीता आवश्यक ती सर्व मदत करण्यास राज्य शासन तत्पर असल्याबाबत आश्वस्त केले आहे.राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व खेळाडूचे अभिनंदन केले असून खेळाडूना मुलभूत कौशल्यापासून तर पारंगत दर्जाचे प्रशिक्षण व त्या करीता आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता नवीन क्रीडा विकास आराखडा तयार करीत असल्याचे प्रतिपादन केले असून या आराखड्याचे आधारावर काम करून येणाऱ्या काही वर्षात राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये मोठ्या संख्येने पदके जिंकताना दिसतील असा विश्वास व्यक्त केला आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'