नाईट अंडर आर्म बॉक्स स्पर्धा उत्सहात संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.): जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना रोजच्या दैनंदिन ताण तणावापासून काही काळ विरंगुळा मिळावा, त्यांच्यामध्ये सुसवांद व्हावा,एकोपा व्हावा, खिळाडू वृत्ती व कौशल्य याला वाव मिळावा. खेळाची भावना निर्माण व्हावी याकरिता सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता अंडर आर्म बॉक्स स्पर्धाचे पोलीस परेड मैदान येथे आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धेमध्ये 22 संघांचे एकुण 176 खेळाडूंनी सहभाग घेतला. प्रत्येक संघामध्ये महिला 1 याप्रमाणे एकुण 22 महिलांनी सुध्दा भाग घेतलेला होता. या सर्व स्पर्धा उत्सहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये झालेल्या सामन्यांमधुन मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग व वैभववाडी पोलीस ठाणे यांची फायनलसाठी निवड झाली. अंतिम सामन्यांमध्ये वैभववाडी पोलीस ठाणे संघाने व मोटार परिवहन विभाग संघाचा पराजय करून विजेतेपद पटकावले. तर मोटार परिवहन विभाग संघ उप विजेता ठरला. एकंदरीत दोन दिवस चाललेल्या नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता संघ- वैभववाडी पोलीस ठाणे, उपविजेता संघ मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग, अंतिम सामन्याचा सामनावीर- गणेश भोवड (वैभववाडी पोलीस ठाणे) मालीकावीर अभिजित तावडे (वैभववाडी पोलीस ठाणे), उत्कृष्ट गोलंदाज- भालचंद्र दाभोलकर (मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग) उत्कृष्ट फलंदाज. अमित निब्रे (मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग) यांना घोषित करून सर्वांना चमक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे आयोजन मानव संसाधन शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, यांनी संयुक्तपणे केले.स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान येथे पार पडले.अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार व त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते. सोबत- फोटो जोडला आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'