धान खरेदीला 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का.): जिल्ह्यामध्ये शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गंत हंगाम 2022-23 मधील धान खरेदीला दि.15 फेब्रुवार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेली आहे. अशा शेतकऱ्यांची तात्काळ धान खरेदी केंद्रावर विक्री करावे, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी अनिल देसाई यांनी केले आहे.
माहे नोव्हेबर 2022 पासून एकुण 39 धान खरेदी केंद्रावर खरेदी सुरु असून शासनाकडून धान खरेदीची मुदत दिनांक 31 जानेवारी 2023 अखेर देण्यात आलेली होती. माहे जानेवारी 2023 अखेर जिल्ह्यातील 301 शेतकऱ्यांची धान खरेदी झालेली नाही. त्याकरीता शासनाकडून दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परंतू मागील दिनांक 3 फेब्रुवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत झालेली धान खरेदी पाहता धान खरेदीचे प्रमाण अत्यल्प आहे. शासनाकडून यापुढे धान खरेदीस मुदतवाढ मिळणार नाही.
00000
Comments
Post a Comment