सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची आई श्री.भराडी देवीच्या चरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रार्थना

सिंधुदुर्गनगरी दि.04 (जि.मा.का):- राज्यातील सर्व जनतेची मनोकामना पूर्ण करावी, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आंगणेवाडी येथील श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेवून केली. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आईच्या चरणी नतमस्तक होतो. श्री. देवीभराडी मातेचे आशीर्वाद घेतो. खरंतर आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला मला येण्याची संधी यापूर्वी मिळाली नाही. पण यावर्षी भराडी देवीमुळे मला आज येण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी आईचे मनापासून आभार मानतो. आई भराडी देवी आपल्या सर्वांना शुभ आशीर्वाद देवो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य मिळावे. अशी आईच्या चरणी प्रार्थना केली. आज मला दर्शनाला संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, असेही ते शेवटी म्हणाले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'