शिष्यवृत्ती नवीन अर्ज नोंदणी जुन्या अर्जाचे नुतनीकरणांसाठी 15फेब्रुवारी पर्यंत मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. ९ (जि.मा.का.) : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडिबीटी प्रणालीवर सन 2022-23 करिता भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी महाविद्यालयातील अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवगासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण्याची प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ ,वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करण्यात येते की, जे विद्यार्थी स्कॉलरशिप योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नुतनीकरण त्वरीत करुन घ्यावेत. वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव जिल्हा समाज कल्याण कार्यालयकडे वर्ग करणेबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी तात्काळ कार्यवाही करावी. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नुतनीकरण करणेबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय सिंधुदुर्गनगरी दूरध्वनी क्र.02362-228882 येथे संपर्क साधावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'