धान खरेदीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी दि. 24 (जि.मा.का) : जिल्ह्यामध्ये शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत माहे नोव्हेंबर 2022 पासून एकूण 39 धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरु असून शासनाकडुन धान खरेदीसाठी दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अंतीम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शासनकाडून धान खरेदीची मुदत दिनांक 15 फेब्रुवारी 2023 अखेर देण्यात आलेली होती. शासनाकडुन यापुढे धान खरेदीस मुदतवाढ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे. त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपले धान खरेदी केंद्रावर विक्री करावे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment