निर्लेखित जडसंग्रह साहित्य खरेदी दरपत्रक 4 मार्च पर्यंत सादर करा
सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का.): फोंडाघाट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पध्दतीने विक्री करावयाची आहे. साहित्य ज्या खरेदीदारास विकत घ्यावयाचे आहे. त्यांनी या कार्यालयात दिनांक 4 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत दरपत्रक सिलबंद लिफाप्यात पाठविण्यात यावीत. अशी माहिती फोंडाघाट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य यांनी दिली आहे.
निविदेच्या बंद लिफाप्यावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्याचे नांव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. दि. 4 मार्च नंतर आलेल्या निविदांच्या स्विकार केला जाणार नाही. निविदा दि.9 मार्च रोजी दुपारी 11 वाजता उघडण्यात येतील. या निर्लेखित जडसंग्रह साहित्य आहे त्या स्थितीत आपल्या स्वखार्चाने नेण्याची व्यवस्था करावी.
अटी व शर्ती
ज्या खरेदीदाराच्या साहित्याचा दर जास्त असेल अशा पात्र खरेदीदारास सदरहू साहित्याची विक्री केली जाईल. ज्याचा दर मंजूर होईल त्यांना ताबडतोब योग्य रक्कम भरुन साहित्य स्वखर्चाने घेवून जावे लागेल. कोणतीही निविदा राखून ठेवण्याचा आणि विक्री रद्द करण्याचा तसेच दरपत्रक स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यालय प्रमुखांना राहील.
00000
Comments
Post a Comment