शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीसाठी 8 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करा -शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे
सिंधुदुर्गनगरी दि.02(जि.मा.का): राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक 8 फेब्रुवारी 2023 असा आहे. अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांनी दिली.
ऑनलाईन अर्ज वेबलिंक https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ वर भरावयाचे आहेत. ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक 8 फेब्रुवारी रोजी 11.59 वाजेपर्यंत आहे. प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याचा कालावधी दिनांक 15 फेब्रुवारी पासून सुरु आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक 22 फेब्रुवारी ते दि.3 मार्च (प्रविष्ट उमेदवारांच्य संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो.)
सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना अमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास msce.tait2022@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.
0000
Comments
Post a Comment