भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योंजनेसाठी 10 मार्च पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि. 24 (जि.मा.का) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दीतीने भरण्यासाठी दिनांक 10 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणांच्या महाविद्यालयातील अनुचुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्हाच्या ठिकाणातील हद्दीपासून 05 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी व इ. 12 वी तसेच इ. 11 वी व इ.12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने वाटप व स्विकृती करण्याची मुदतवाढ दि.10 मार्च 2023 अखेर करण्यात येत आहे. या विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात व या कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध आहेत.अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे दूरध्वनी क्रमांक 02362 228882 वर संपर्क साधावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'