निवृत्तीवेतनधारक अडचणीसंदर्भात 17 फेब्रुवारी तिमाही बैठकीचे आयोजित
सिंधुदुर्गनगरी दि.7 (जि.मा.का): निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडी- अडचणीसंदर्भात, जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग येथे शुक्रवार दि.17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तिमाही बैठकीचे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती अप्पर कोषागार अधिकारी संजय गोविंद घोगळे यांनी दिली.
निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक व त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दर 3 महिन्यांनी जिल्हा स्तरावर बैठक आयोजित केली जाते. त्यामध्ये बँकच्या व शासनाच्या सेवेसंदर्भात संबंधितांना येणाऱ्या अडी-अडचणींवर उपाय योजण्यासाठी चर्चा केली जाते. यासंदर्भात आपल्याकडील तक्रारी, हरकतीसह या बैठकीस उपस्थित रहावे.
0000
Comments
Post a Comment