नवोदय विद्यालयात 6 वी प्रवेशासाठी 8 फेब्रुवारी पर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि.01 (जि.मा.का): शिक्षा मंत्रालय, भारत सरकार व्दारा संचलित जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 6 वी वर्गात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतीम मुदवाढ दि. 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत करण्यात आली आहे. अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी दिली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. या वर्षी प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालायल समिती,नोयडा व्दारा प्राप्त झाली असून सदरच्या प्रवेशाची सर्व माहिती इ. 6 वी साठी https://navodaya.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतीम तारीक्ष 31 जानेवारी 2023 पर्यंत होती. ती वाढवून 8 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आली आहे. या मुदतवाढीचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'