मोबाईल अँप व्दारे ई-पीक पाहणी नोंदणी करिता 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) : रब्बी हंगाम 2023 ची मुदत दि. 31 जानेवारी 2023 रोजी पर्यंत होती. तथापि मान्सून उशिरापर्यंत लांबल्यामुळे रबी हंगामाची उशिराने पीक पेरणी झाली आहे. जिल्हा पातळीवरुन क्षेत्रीय अधिकारी यांनी रब्बी हंगाम मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केल्याने रब्बी हंगाम 2023 मोबाईल अँप व्दारे ई-पीक पाहणी नोंदणी करिता दि. 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. अशी माहिती कुळवहिवाट शाखेचे नायब तहसिलदार संतोष खरात यांनी दिली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'