अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप निवेदन संकेस्थळावरुन ऑनलाईन स्वरुपात नोंदवा - शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे
सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का.): पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8 वी दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे-1 या कार्यालयामार्फत घेण्यात आली. परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम उत्तरसुची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन संकेस्थळावरुन ऑनलाईन स्वरुपात करता येईल. अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांनी केले आहे.
ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question paper & Interim Answer key या हेडिंगखाली उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. त्रुटी,आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि.17 ते 23 फेब्रुवारी रोजी- पर्यंत मुदत देण्यात येत आहे. दि. 23 फेब्रुवारी नंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल. समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी, आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही. विहित मुदततीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसुची परिषदेच्या संकेस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करण्याकरीताची कार्यपध्दती - विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
00000
Comments
Post a Comment