विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सवात निरीक्षणगृह व बालगृह संस्थेतील बालकांचे दैदीप्यमान यश - अधीक्षक बी.जी. काटकर

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : मुंबई येथे पार पडलेल्या विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सवात जिल्ह्यातील चैतन्य परब गोळाफेक प्रथम क्रमांक, आदित्य राठोड (न्यु इंग्लिश स्कुल ओरोस) 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक, निहीत मालवणकर व आदित्य राठोड कॅरम स्पर्धा व्दितीय क्रमांक, तसेच स्वराज पाटील (डॉन बॉस्को स्कुल ओरोस) याने वक्तृत्व स्पर्धमध्ये तृतीय क्रमांक पटकावला ही सर्व मुले शासकिय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह ओरोस या संस्थेतील आहेत.या सर्व बालकांनी बालमहोत्सवात दैदीप्यमान यश संपादन केले आहे, अशी माहिती शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे अधीक्षक बी.जी. काटकर यांनी दिली. विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सव सन 2022-23 चे दि.23 फेब्रुवारी ते दि.25 फेब्रुवारी या कालावधीत दि चिल्ड्रेन एड सोसायटी संचलित चेंबुर चिल्ड्रेन्स होम, मानखुर्द मुंबई येथे विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग, कोकण विभाग, मुलुंड-मुंबई यांनी आयोजन केले होते. या बालमहोत्सव मध्ये कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बालगृह व निरीक्षणगृह संस्थानी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध वैयक्तिक व सांघिक क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते यामध्ये शासकिय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह ओरोस या संस्थेतील बालकांनी सहभाग घेवून दैदीप्यमान यश संपादन केले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी तसेच यांनी यश संपादन केलेल्या सर्व बालकांचे अभिनंदन करुन बालकांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी व बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी यशस्वी बालकांचे अभिनंदन केले आहे. महिला व बाल विकास विभाग, यांच्यामार्फत राज्यातील अनाथ, निराधार, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या तसेच उन्मार्गी लागलेल्या बालकांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्याकरीता सन 2012 पासुन चाचा नेहरु बाल महोत्सव साजरा करण्यात येतो. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'