शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन पोलीस बँडकडून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीताची धून

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 19 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ओरोस फाटा येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात ‘जय शिवाजी जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत कृषी महाविद्यालयाचे आणि गुरुकुल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यानंतर पोलीस बँड पथकाकडून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून वाजविण्यात आली. उपस्थितांनी देखील हे राज्यगीत म्हटले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन केले. यानंतर पुष्पहार अर्पण करुन महाराजांना वंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनीही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्यासह उपस्थितांनी पुष्प वाहिले. यावेळी अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'