उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रमात स्टॉलसाठी आंबा उत्पादकांची नोंदणी 6 फेब्रुवारी पासून सुरु - उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर ना. पाटील
सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याचे दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. त्याला नेहमीच उत्सफुर्त प्रतिसाद मिळतो. आंबा हंगाम 2023 करिता आंबा उत्पादकांना आंबा विक्री करिता पुणे आणि राज्यातील, परराज्यातील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्याकरिता आंबा उत्पादकांची नोंदणी दि. 6 फेब्रुवारी 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती कृषि पण मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर ना. पाटील यांनी दिली.
स्टॉल नोंदणी करिता आंबा नोंदीसह 7/12 उतारा (मागील 6 महिने कालावधीतील) आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत व कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेतल्याचे प्रमाणपत्र,भौगोलीक मानांकन नोंदणी प्रामणपत्र प्रत, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे नावे रु.10,000/- अनामत रक्कमेचा धनाकर्ष अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहीत नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इ. कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत. इच्छुक आंबा बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी आवार शांतीनगर, नाचणे, जि.रत्नागिरी (02352-299328)अथवा श्री. कपिल खामकर,कृषी व्यवसाय पणन तज्ञ(8805652233) यांचेशी संपर्क साधून नांव नोंदणी करावी, असे आवाहन कृषी पणन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. नाव नोंदणीसाठीचे अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख 28 फेब्रुवारी आहे.
0000
Comments
Post a Comment