अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 13 मार्च पर्यंत अर्ज सादर करा
सिंधुदुर्गनगरी दि. 28 (जि.मा.का) : मालवण तालुक्यातर्गंत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी रिक्त पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत १३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) बाल विकास प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प मालवण यांच्या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन मालवण एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
एकूण ७१ पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज स्वतःची स्वाक्षरी करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (सोबत अर्जाचा नमुना) लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापत्र जोडणे अनिवार्य आहे. अर्जासोबत जन्म नोंदीचा दाखला / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, सरपंचयांच्याकडील कायम रहिवाशी दाखला विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला, तसेच खाली दर्शविले प्रमाणे अ ते फ पर्यत आवश्यक प्रमाणपत्राच्या सत्यप्रती करून जोडणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता- अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी १२ वी उत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. वास्तव्याची (स्थानिक रहिवाशी असणे) अट- अर्जदार फक्त त्याच महसूली गावातील (ग्रुप ग्रामपंचायत नव्हे) कायम रहिवाशी महिला उमेदवार आवश्यक असून त्यांनाच स्थानिक समजावे.वयाची अट: अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी
सेविका व मदतनीस या मानधनी पदावर सरळ नियुक्तीसाठी (BY NONINATION) वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे अशी राहित. तथापी विधवा महिलासाठी हि वयोमर्यादा कमाल ४० वर्ष अशी राहील.
लहान कुटूंब- अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदासाठी लहान कुटूंबाची अट लागू आहे. अर्जासोबत लहान कुटूंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र लिहून देणे,बंधनकारक आहे.लहान कुटूंब यांचा अर्थ दोन जिवंत मुले यांसह पत्नी (आई, वडील, सासू, सासरे, इत्यादी यासह असा आहे.
विधवा व अनाथ मुली:-१)आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची विधवा पत्नी (स्थानिक) २) शासकीय संस्थेत राहत असलेली विधवा (स्थानिक) ३)शासन अनुदानीत संस्थेत राहत असलेली विधवा.४) इतर विधवा महिला स्थानिक. ५)शासकीय संस्थेत राहत असलेल्या अनाथ मुली. ६)शासन अनुदानीत संस्थेत राहत असलेल्या मुर्ली- अशा विधवा महिला व अनाथ मुली टिप-वरित अनुक्रमाक १ करिता संबंधित तहसिलदार अनु 2.3.4,5,6,करिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अनुक्रमांक ४ करिता संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी (BDO) अथवा तहसिलदार नागरी कक्षात्राचे बाबतीत महानगर पालिका नगर पालीका यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
1) प्राप्त अर्जानुसार उमेदवाराची प्राथमिक यादी शैक्षणिक पात्रता, विधवा/अनाथ, जात, जन्म तारीख, विवाह नोंदणी दाखला लहान कुटूंब, वय व स्थानिक रहिवास दाखवा इ. बाबत आवश्यक सत्यप्रत प्रमाणपत्राच्या आधारे तयार करून अर्ज प्राप्त करणेच्या अंतिम तारखेनंतर 8 दिवसात जिल्हयाचे कार्यालय, पंचायत समिती, बालविकास प्रकल्प कार्यालय व क्षेत्राच्या नोटीस बोर्डावर परिशिष्ट क नमुना प्राथमिक यादी (पात्र/अपात्र उमेदवारांची यादी) लावणेत येईल.नोटीस बोर्डवर यादीतील कोणत्याही उमेदवाराचे प्रमाणपत्र व त्याबददत दिलेले गुण उदा. जात, गुण,वय,अपत्य, विधवा इत्यादी बाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केल्यास तक्रारीची शहानिशा करून उमेदवारांच्या एकूण गुणांत बदल झाला असल्यास तशी नोंद लाल शाईने गुणवत्ता [यादीत (MERIT LIST) सुधारणा करणेत येईल. यानंतर कोणतीही तक्रार आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
(3) विहित नमुन्यातील अर्ज व अर्जदार यांची स्वाक्षरी नसलेस अर्ज फेटाळण्यात येईल. 4) अपात्र ठरवणेत आलेल्या उमेदवाराला वेगळे कळवणेत येणार नाही. विहीत मुदतीत प्राप्त न होणारे अर्ज अपात्र ठरतील याबाबत पुढील कोणतीही कार्यवाही किंवा पत्रव्यवहार करणेत येणार नाही. अर्जदार यांना परिशिष्ट अ नुसार गुणांची यादी नमुना परिशिष्ट ब मध्ये प्रसिद्ध करणेची असल्याने त्याचे शैक्षणिक पात्रतेबाबत टक्केवारी दर्शविणारे गुणपत्रक प्रमाणपत्र जात, विधवा, अनाथ व अनुभव इ. वर आधारीत गुण देणेचे असल्याने उमेदवारानी अर्जा सोबत खाली दर्शवितेप्रमाणे आवश्यक प्रमाणपत्राच्या झेराक्स प्रति ची सक्षम प्राधिकाऱ्याकडून सत्यप्रत करून क्रमवारी नुसार कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अ.क्र. 1 ते 6 आवश्यक असून त्यांच्या सत्यप्रती न जोडल्यास अर्ज अपात्र करणेत तसेच अ.क्र.7 ते 14 ची प्रमाणपत्रे आवश्यकते नुसार जोडणेत यावे.
7) जर ही जाहिरात दिल्यानंतर एकाही पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झाला नाही. किंवा फक्त एकच पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झाला, तर फेर जाहिरात देण्यात येईल. तरीही एकच अर्ज प्राप्त झाल्यास फेर जाहिरात देऊन सुध्दा फक्त एकच पात्र अर्ज प्राप्त झाला तर त्या उमेदवाराची निवड करण्यात येईल मात्र त्या उमेदवाराच्या कागदपत्र व दाखले यांची संबंधीत शासकिय यंत्रणेमार्फत पडताळणी करणेत येईल.
8)अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका / मदतनीस पदासाठी शैक्षणिक अर्हतेनुसार व प्राप्त टक्केवारी नुसार गुणांकन करायचे असल्याने सदर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेचे
क्रमवारीनुसार (1. 12.वी. 2. पदवी, 3. पदव्युत्तर 4. डी. एड. 5. बी.एड. संगणक परीक्षा MS-CIT) गुणांची टक्केवारी दर्शविणारे गुणपत्रके / प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा गुण देणेत येणार नाहीत. याची नोंद घ्यावी. 9) विहीत मुदतीनंतर कोणतेही कागदपत्र जोडून घेणेत येणार नाहीत किंवा त्या आधारे गुण दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. 10) अर्जदाराने स्वता:चा पत्ता पुर्णपणे लिहावा. अर्जदार यांनी दिलेल्या पत्यात बदल झाल्यामुळे कार्यालयीन पत्र न मिळालेस कार्यालय जबाबदार राहणार नाही 12) संपर्कासाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक-02365-251514 असा आहे.
0000
Comments
Post a Comment