अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करा - प्र.प्राचार्य बी.पी.सोनवणे

सिंधुदुर्गनगरी दि. 23 (जि.मा.का) : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार अल्पसंख्यांक युवक-युवतींसाठी Technician Instrumentation या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमासाठी 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन दोडामार्गचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्र.प्राचार्य बी.पी.सोनवणे यांनी केले आहे. अभ्यासक्रम 420 तासांचा असून, अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्णतः निशुल्क आहे. अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता 10 वी पास आहे. अभ्यासक्रम हा NSQF level 4 चा असून मुस्लीम, शीख, पारसी, जैन, बुद्धिष्ठ व ख्रिश्चन इ. अल्पसंख्यांक उमेदवार हे या प्रशिक्षण प्रवेशास पात्र असतील. 10 वी गुणपत्रिका झेरॉक्स, अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड व 2 पासपोर्ट साईज फोटो इ. कागदपत्रे प्रवेशासाठी आवश्यक आहेत. 1 एप्रिल 2023 पासून या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरु होत आहे. प्रवेश मर्यादा 30 उमेदवार आहे. या प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी प्रशिक्षण समन्वयक आर. डी. जानवेकर मोब नं ९४२२४२७८३४ आणि एस. के चारी मोब. नं ८२६३८९८३८५ यांच्याशी संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष संस्थेमध्ये येवून कार्यालयाशी संपर्क करावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'