मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R.) मोहिमेला सुरुवात मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष मोहिम; कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिंधुदुर्गनगरी, दि. 01 (जिमाका) :- मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ‘Special Intensive Revision (SIR)’ या विशेष मोहिमेची सुरूवात 1 एप्रिल 2026 होत आहे. नव्या मतदारांची नोंदणी, अपात्र नोंदी वगळणे तसेच स्थलांतरित नागरिकांची माहिती अद्ययावत करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या मोहिमेमध्ये नेमून देण्यात आलेले काम सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने पूर्ण करावीत. कामामध्ये हयगय केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल पासून विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R.) मोहिम सुरू झाली आहे. या अनुषंगाने कुडाळ येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण व आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, तहसिलदार सचिन पाटील, गणेश लव्हे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO)जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, या मोहिमेमध्ये देण्यात आलेली जबाबदारी सर्वांनी यशस्वीरित्या पार पाडावी. या मोहिमेच्या अनुषंगाने नियमित आढावा घेण्यात येणार आहे. कामात हयगय केल्यास केवळ नोटीसा न देता गंभीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 00 000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'