पोषण पंधरवड्यानिमित्त शपथ

सिंधुदुर्गनगरी दिनांक १७ (जिमाका) :- महिला व बालकल्याण विभागामार्फत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य आहार, आरोग्यदायी सवयी तसेच स्क्रीन टाईम कमी करण्यावर विशेष भर देण्यात यावा. दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यात यावे. मोठ्या मुलांसाठी स्क्रीन वापर मर्यादित ठेवावा तसेच घरात मोबाईल फ्री वातावरण निर्माण करण्याची शपथ आज देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या १५ एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर पोषण पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही शपथ घेण्यात आली. या माध्यमातून पालक व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, महिला व बालविकास समिती सभापती अनुराधा नारकर, समाजकल्याण समिती सभापती रुहिता तांबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सभापती, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'