जिल्हास्तरावर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- क्रीडा प्रतिभा विकास प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडूंची निवड करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हास्तरावर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन दि. 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी होणाऱ्या निवडचाचणीत सहभाग घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने क्रीडा विभाग व क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके संपादन करून ऑलिंपिक, आशियाई कॉमनवेल्थ इत्यादी स्पर्धा मध्ये भारताचे व राज्याचे नाव उज्वल करणे या उद्देशाने मिशन लक्षवेधी महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रकरिता सध्य स्थितीत अथलेटिक्स या खेळाचे अनिवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तरी ईच्छुक खेळाडूंनी https://docs.google.com/forms/d/e/1FAlpQLSddaNtflwENEHm५i२-tedklygmmL49ZARzsH204aeXwBEkg/viewform?usp=publish-editor या गुगल लिंक वर आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'