रमाई आवास शहरी योजना बैठक संपन्न
सिंधुदुर्गनगरी दिनांक 08 (जिमाका) :- सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्यण कार्यालयाकडून विविध योजना राबविण्यात येतात त्यापैकी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत नगरपरिषद वेंगुर्ला यांच्याकडील प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी यांच्या निजी दालनात बैठक पार पडली असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सन २०२४-२५ व २०२५-२६ करीता मंजूर उद्दिष्टांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींनी रमाई आवास योजनेसाठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना मुख्याधिकारी व नगरविकास शाखेच्या प्रतिनिधींना दिल्या. तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेकडून प्राप्त दोन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, नगरविकास शाखा लेखापाल प्रणव वालावलकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, वेंगुर्ला नगरपरिषद शहस्तरीय तांत्रिक कक्ष अभियंता प्रतिक डोंगरदिवे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, वशेष अधिकारी तुषार गवळी, समाज कल्यण निरीक्षक चित्रांगी तोरस्कर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment