अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 (जिमाका) :- अक्षय तृतीया दिवशी होणारे बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. बालविवाह करणाऱ्यांची गय केली जाणार नाही व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला,असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बापू शिणगारे यांनी दिली. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये कलम 16 (1) नुसार ग्रामीण भागातील ग्रामसेवक शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्त्वाची व सामाजिक क्रिया आहे. साहजिकच शुभमुहूर्तावर विवाह विधी केले जातात. अक्षतृतीयेच्या शुभमुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात .त्या अनुषंगाने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. बालविवाहात सहभागी होणारे व सहकार्य करणारे व्यक्ती ,धार्मिक गुरु, पंडित, सेवा देणारे व्यावसायिक, मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यवसायिक आणि वाजंत्री यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे सेवा देताना मुलगी 18 वर्षे पूर्ण व मुलगा 21 वर्ष पुर्ण असल्याची खात्री करण्यात यावी .नागरिकांनी बालविवाह रोखण्यासाठी हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक 1098 किंवा 112 वर माहिती द्यावी .नागरिकांनी सतर्क राहून बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा माहिती व बालविकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'