ारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे शुभारंभ
भ
सिंधुदुर्गनगरी दिनांक 08 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” कार्यक्रमाचा शुभारंभ दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सिंधुदुर्गनगरी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. हा कार्यक्रम सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी तुषार गवळी, यांनी केले. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग तसेच बार्टी यांच्यामार्फत निंबध स्पर्धामध्ये क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व बक्षिस देवून गैरविण्यात आले. उपस्थित पत्रकारांना समाज कल्याण,विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती अध्यक्ष समीक्षा चंद्रकार, जिल्हा जात पडताळणी समिती उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक, सहायक आयुक्त संतोष चिकणे, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण उदय गायकवाड, सहाय्यक लेखाधिकारी- उदय यादव, तसेच नागरिक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तसेच इतर मागास बहुजन कल्याण व जिल्हा जात पडताळणी विभागाचे कर्मचारी/अधिकारी तसेच समतादूत (बार्टी) सर्व कर्मचारी, विविध महामंडळातील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समतादुत संगुण जाधव यांनी केले.
सामाजिक सप्ताह निमित्त दि.०८ एप्रिल ते दि.१४ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात महिला मेळावा,ज्येष्ठ नागरीक मेळावा,रक्तदान शिबिराचे, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असल्याने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण,सहायक आयुक्त, संतोष चिकणे यांनी केले.
०००००
Comments
Post a Comment