सामाजिक समता सप्ताहानिमित्त जेष्ठ नागरिक मेळावा व रक्तदान शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.१५ (जिमाका ):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने १३ एप्रिल रोजी जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर, नागरिकांचा मेळावा तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे उपआयुक्त तथा सदस्य विशाल नाईक यांनी दिली आहे. या कार्यक्रमांदरम्यान जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने नागरिकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा जात पडताळणी समिती उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्रीमती रुईना तांबे, जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष रजत रेगे, जिल्हा सरचिटणीस सखाराम सपकाळ, माजी जिल्हाध्यक्ष बी. के. मराठे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालेकर, समाज कल्याण अधिकारी तुषार गवळी तसेच लेखा अधिकारी उदय यादव आदी मान्यवर उपस्थित होते. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'