जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न
सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्याची माहिती समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी विकास बडबे, पोलीस निरीक्षक ज्योती चव्हाण, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता ममता पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, विशेष अधिकारी तुषार गवळी, तसेच संबंधित शाखेचे संतोष परुळेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे, त्यांची सद्यस्थिती, तसेच समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे व अत्याचार पीडितांना नुकसान भरपाईचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी पोलीस तपासावर प्रलंबित प्रकरणे, मागील बैठकीचे इतिवृत्त व अर्थसहाय्याबाबतचा आढावा समितीसमोर दिला.
००००००
Comments
Post a Comment