सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्या वतीने “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” निमित्त दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायक लोकअभिरक्षक ॲड. श्रीमती श्वेता तेंडूलकर यांच्याकडून “ज्येष्ठ नागरिक अधिनियम २०१३” अन्वये कायदेविषयक मार्गदर्शन व मेळावा, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, नागरिक तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'