एमएचटी-सीईटी २०२६ प्रथम सामाईक परीक्षा (पीसीएम गट) परीक्षा ११ ते २० एप्रिल च्या दरम्यान

सिंधुदुर्गनगरी दिनांक 09 (जिमाका) :- शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने एमएचटी-सीईटी २०२६ प्रथम सामायिक परीक्षा( पीसीएम गट) दिनांक ११ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.४५ या वेळेत एस. एस. एस. पी. एम इंजीनियरिंग कॉलेज, कणकवली व शासकीय तंत्रनिकेतन मालवण या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे. एस .एस. पी .एम इंजीनियरिंग कॉलेज, कणकवली येथील परीक्षा केंद्रावर दिनांक १३ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ व १६ एप्रिल २०२६ रोजी तर शासकीय तंत्रनिकेतन, मालवण या परीक्षा केंद्रावर दिनांक ११ एप्रिल ते १३ एप्रिल व १५ एप्रिल ते २० एप्रिल २०६ या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'