परदेशी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्हयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी परदेशामध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला असेल अशा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी परदेशी शिष्यवृत्तीचा अर्ज "समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे 411001” येथे सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
शासनाच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गाती गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशमध्ये शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज http://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 15 मे 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यत ऑनलाईन सादर करावे "समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे 411001" येथे DG Lockar व्दारे आवश्यकती सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करणे बंधनकारक आहे.अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर तसेच योजनेचे निकषांची माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.
सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्य आयुक्त समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र. ०२३६२-२२८८८२ येथे संपर्क साधावा.
०००००
Comments
Post a Comment