समाज कल्याण विभागातर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजर

ी सिंधुदुर्गनगरी, दि.१५ (जिमाका ):- समाज कल्याण, विभागामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या औचित्याने महिला मेळावा व जनजागृती शिबिर संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सहायक आयुक्त संतोष चिकणे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन, कार्य व सामाजिक संघर्ष यावर मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते श्री. नचिकेत पवार यांनी ‘महात्मा फुले यांचे शिक्षणविषयक विचार आणि आजची सामाजिक स्थिती’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच बार्टी समतादूत यांच्या माध्यमातून मालवण येथे पुस्तक वाचन उपक्रमही राबविण्यात आला. तसेच समाज कल्याण विभागामार्फत महिला मेळावा व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्या सहायक संचालक सरकारी अभियोक्ता ॲड. ममता पाटील यांनी महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास समाज कल्याण अधिकारी तुषार गवळी, सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव तसेच विभाग व महामंडळांतील अधिकारी-कर्मचारी, वसतिगृहातील गृहपाल, बार्टी समतादूत कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन महेंद्र मेन व सगुण जाधव यांनी केले. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'