तीन महिन्यांचे अन्नधान्य ३० एप्रिलपर्यंत उचल करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 09 (जिमाका) :- केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या कार्यक्षम लॉजिस्टिक व साठवणुकीच्या अडचणी लक्षात घेता माहे एप्रिल, मे आणि जून 2026 या कालावधीचे अन्नधान्य आगाऊ उचल करुन लाभार्थ्यांना त्वरीत वाटप करण्याचे केंद्र व महाराष्ट्र शासनाचे निर्देश आहेत. अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाचे पात्र लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत संबंधित रास्त भाव धान्य दुकानदरांकडून उचल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच जिल्ह पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. धान्याची आगाऊ उचल करताना लाभार्थ्यांनी ईपॉस मशीन वर तीन वेळा थंब लावून माहे एप्रिल, मे व जून महिन्यांचे धान्य मिळाल्याची खात्री करावी. लाभार्थ्यांनी लवकरात लवकर धान्य उचल करुन सदरच्या शासनाच्या धोरणत्मक घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कामात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'